Homeताज्या बातम्या२५० किमी प्रवास करून अवघ्या ०८ तासांत १३ वर्षीय मुलीचा शोध लोणीकाळभोर...

२५० किमी प्रवास करून अवघ्या ०८ तासांत १३ वर्षीय मुलीचा शोध लोणीकाळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

२५० किमी प्रवास करून अवघ्या ०८ तासांत १३ वर्षीय मुलीचा शोध

लोणीकाळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
दिनांक ०९/०१/२०२६ रोजी दुपारी सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या सेविकेची १३ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. काम संपल्यानंतर मुलगी बाहेर न दिसल्याने तक्रारदार महिलेने परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगी मिळून न आल्याने रात्री सुमारे १०.०० वाजता लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणीकाळभोर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे सदर पीडित मुलगी उस्मानाबाद परिसरात असल्याचे निदर्शनास आले. वेळ न दवडता विशेष पथकाची नेमणूक करून सुमारे २५० किमी अंतराचा प्रवास करत अवघ्या ०८ तासांत पीडित मुलीचा शोध घेण्यात आला.
पोलीस पथकाने पीडित मुलीस सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे आणले. आवश्यक वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मुलगी सुखरूप असल्याची खात्री करण्यात आली आहे.
या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे पीडित मुलीचा जीव वाचविण्यात यश आले असून लोणीकाळभोर पोलिसांनी समाजात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ६ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात....

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

error: Content is protected !!