लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल, बार व वाईन्स चालकांची बैठक
नववर्ष स्वागतासाठी कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन
लोणी काळभोर (पुणे) :
नववर्ष व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने हद्दीतील हॉटेल, बार, वाईन्स शॉप, बिअर शॉप, परमिट रूम व लॉज चालक-मालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सदर बैठक दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे पार पडली.
या बैठकीत कामगारांचे पोलिस व्हेरीफिकेशन करून घेणे, दारू पिण्याचा वैध परवाना असलेल्या ग्राहकांनाच मद्य विक्री करणे, 18 वर्षाखालील व्यक्तींना दारू न देणे, बिलावरून ग्राहकांशी वाद न घालणे, स्वयंसेवकांची नेमणूक करणे, हॉटेल व परिसरात रस्त्यापर्यंत कव्हर होईल अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी सूचनांचा समावेश होता.
तसेच ग्राहकांना अनावश्यक वेळ थांबवून न ठेवणे, शासनाने व पोलिसांनी नेमून दिलेल्या वेळेतच हॉटेल/बार बंद ठेवणे, ध्वनीक्षेपकांच्या वापराबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणे व कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित 112 क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे सुस्थितीत ठेवणे, सुरक्षा ऑडिट करून घेणे आणि एकूणच कायदा-सुव्यवस्थेबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्यासह सुमारे 30 ते 35 हॉटेल, बार, वाईन्स, परमिट रूम व लॉजचे चालक व मालक उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या या सूचनांचे काटेकोर पालन करून नागरिकांनी व व्यावसायिकांनी नववर्ष सुरक्षित व शांततेत साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























