Homeताज्या बातम्यासणासुदीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन‌ बांधावर

सणासुदीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन‌ बांधावर

सणासुदीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन‌ बांधावर

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.
दसरा सारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशीही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात प्रशासन सहभागी झाले. राहुरी तालुक्यातील कोंढवड व शिलेगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे केले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका, घास या महत्त्वाच्या पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मेहनतीने पिके वाढविलेल्या शेतकऱ्यांच्या आशा अक्षरशः पाण्यात गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोंढवड परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या आशेने शेती पिकांवर मोठा खर्च केला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टीने सर्व श्रम वाया गेले असल्याचे चित्र आहे.

काल दसऱ्याचा सण होता. सर्वजण हा सण कुटुंबासोबत घालवत होते. परंतु शेतकऱ्यांना शासनाची मदत दिवाळीपूर्वी मिळावी या हेतूने तलाठी राहुल कराड, कोंढवड ग्रामसेवक सुखलाल हारदे, शिलेगाव ग्रामसेवक सविता बाचकर व कृषी सहायक भारती ढगे यांनी दसऱ्याच्या दिवशीही प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले. हेच नाही तर आपल्याकडे पाच दिवसांचा आठवडा असताना शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस होते. मात्र याही दिवशी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत होते.

यावेळी वेणूनाथ हिवाळे, गणपत म्हसे, बबन सातपुते, देविदास म्हसे, प्रसाद म्हसे, सुभाष बर्डे, समीर सातपुते आदींनी सहकार्य केले. या प्रसंगी मधुकर म्हसे, विष्णू म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, पांडुरंग म्हसे, संदीप उंडे, परशुराम कोळसे, रमेश म्हसे, सुरेश म्हसे, राजेंद्र पेरणे, कृष्णा म्हसे, किशोर म्हसे, सचिन म्हसे, निलेश म्हसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

error: Content is protected !!