पालघर साधू हत्याकांड, ड्रग्ज तस्कर भाजपचे उमेदवार…
शिवसेना आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेतून जोरदार आंदोलन
पुणे – 22 नोव्हेंबर 2025
पुणे:- भाजपच्या दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने स्वा. सावरकर स्मारक, सारसबाग सिग्नल चौक येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले.
पालघर साधू हत्याकांडातील गुन्हेगार काशिनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश देणे आणि ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे याला तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी देणे हे भाजपचे “हिंदुत्व” असल्याचा सवाल शिवसैनिकांनी आंदोलनातून तीव्रपणे उपस्थित केला.
त्याचबरोबर निवडणुकीपुरता मुस्लिम टोपी घालणारा आशिष शेलार कुरेशी याचे “खोटे आणि बेगडी हिंदुत्व” शिवसैनिकांनी आंदोलनात उघड करत भाजपचा बुरखा फाडला. आजचे आंदोलन म्हणजे भाजपच्या प्रायोजित पाखंडी हिंदुत्वाला दिलेल सडेतोड प्रत्युत्तर आहे.
स्वा. सावरकर पुतळ्याची बिकट अवस्था — प्रशासनाचा निषेध
स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, सारसबाग सिग्नल चौक येथे गेल्या अनेक दिवसांपासून पुतळ्याची स्थिती बिकट असून प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे आंदोलनाच्या माध्यमातून समोर आले.
शिवसैनिकांनी स्वतः पुढाकार घेत पुतळ्याची स्वच्छता, पाण्याने अभिषेक, आणि स्वा. सावरकरांच्या चरणी दुग्धाभिषेक करून खरी हिंदुत्वनिष्ठ भावना दाखवली.
राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची केवळ अहवालाना करणारे असून, त्यांच्या हिंदुत्वाला केवळ राजकारणासाठी वापरते—याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्रात दिसत आहे.
हिंदुत्वाचा वारसा जपण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे आंदोलनातून शिवसैनिकांनी “स्वा. सावरकर आम्हाला माफ करा” अशी भावनिक गर्जना केली.
यावेळी आंदोलनास शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे
मा नगरसेवक अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका अमृत पठारे, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण , संदीप गायकवाड, विलास सोनावणे, शशिकांत पापळ, संतोष भुतकर, दीलीप पोमण, रोहीत गलांडे, गणेश घोलप, राहुल आलमखाने, रोहित लगाडे, नागेश खडके, राहुल शेडगे
ज्ञानंद कोंढरे, राजेंद्र आवारे
धनंजय देशमुख , परेश खांडके
आदित्य काटे, नितीन निगडे, राजेंद्र शहा
योगेश खरात , संजय वाल्हेकर , महेश कदम , शिवाजी मेलेकरी , वीरेश अडागळे , नितीन दलभंजन, सुनील हळंदे , राहुल शिंदे , दत्तात्रय करपे , रमेश लडकत , अमृता ताई गायकवाड , सीमाताई मगर , संजय वाल्हेकर , संजय लोहोट, निलेश पवार, सुनील हळंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कळावे
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























