रामशास्त्री तंटामुक्त समाज समितीची 138 वी सभा यशस्वी; 24 प्रकरणांवर सुनावणी, तडजोडीतून समाधान
क्राईम महाराष्ट्र न्यूज चैनल कार्यकारी
संपादक सागर लोहार+919881515725
हडपसर, पुणे | अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि तंटामुक्त समाज निर्माणाच्या उद्दिष्टाने आयोजित “रामशास्त्री तंटामुक्त समाज समिती सभा क्रमांक 138” रविवारी (दि. 07 डिसेंबर 2025) प्रभू श्री विश्वकर्मा मंदिर, लोहार समाज भवन, काळेपडळ येथे यशस्वीपणे पार पडली.

सभा सकाळी 11.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत झाली. श्री दिलीप वसव यांनी स्वागत करून सभेची सुरूवात केली. तंटामुक्तीच्या कार्यपद्धती, दाखल प्रकरणांची माहिती, तसेच समितीचे फायदे–तोटे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे कामकाज श्री राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
२४ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी; एक प्रकरण तडजोडीतून निकाली
सभेत एकूण 24 केसेस दाखल होत्या.
त्यापैकी:
४ वादी–प्रतिवादी प्रत्यक्ष उपस्थित राहून चर्चा झाली
१ प्रकरण मान्यतापत्रासह तडजोड करून निकाली काढण्यात आले
३ प्रकरणे पुढील सभेत तडजोडीच्या मार्गावर
उर्वरित प्रकरणांवर पुढील तारखेला सुनावणी होणार आहे.
सभेच्या यशासाठी समितीची एकजूट
कामकाजात कुमारभाऊ थोरात, राजेंद्र पवार, दीपक चव्हाण, सागर लोहार, महेंद्र लोखंडे, विजय माने, दिलीप वसव यांनी सक्रिय सहभाग घेतला. समिती सदस्यांनी वादी–प्रतिवादींना न्याय लवकर मिळावा यासाठी दोन महत्त्वपूर्ण निर्णयांची शिफारस केली:
समितीचे महत्त्वाचे दोन निर्णय
1) गैरहजर पक्षकारांना अंतिम समन्स
जे वादी–प्रतिवादी वारंवार गैरहजर राहतात, त्यांना
पुन्हा समन्स पाठवणे
आवश्यकता असल्यास प्रतिनिधीमार्फत त्यांचे मत जाणून घेणे
अन्यथा अशी प्रकरणे रद्द करण्याचा निर्णय.
2) दिर्घकाळ प्रलंबित प्रकरणांसाठी विशेष उपक्रम
8–10 वर्षे न्याय न मिळालेल्या गरीब व दुर्बल कुटुंबांसाठी
समिती सदस्य व समाज हितचिंतकांना भेटीद्वारे संवाद साधण्याचे निर्देश त्यांच्या एरियातील पोलीस स्टेशनच्या सहकार्याने थेट तंटामुक्ती बैठक आयोजित करण्याचा निर्णय.
तंटामुक्ती चळवळीचा विस्तार—समाजाला थेट आवाहन
समिती सदस्यांनी संपूर्ण लोहार समाजाला आवाहन केले की—
प्रत्येक जिल्ह्यात व विभागात असे मुक्त व्यासपीठ असावे. समाजातील ज्येष्ठ, वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, पत्रकार, पदाधिकारी, महिला आणि युवकांनी उपस्थित राहून या लोककल्याणकारी उपक्रमांना बळ द्यावे.
प्रगतीचा आढावा : 138 सभांमध्ये 262 तंटे मिटले
7 डिसेंबर 2025 अखेर समितीकडे एकूण 407 तंटे अर्ज दाखल झाले असून:
262 प्रकरणे तडजोडीने यशस्वीपणे निकाली
58 प्रकरणे गैरहजेरीमुळे रद्द
64 वादी–प्रतिवादींनी परस्पर तडजोड करून मिटविले
23 प्रकरणे मिटण्याच्या मार्गावर
याशिवाय, अर्ज दाखल करण्यापूर्वीच परस्पर समजुतीने 264 दावे समाजातच मिटविण्यात यश.
तंटामुक्ती समिती—शांततापूर्ण समाजाची वाटचाल
या उपक्रमामुळे
मानसिक–भावनिक ताण कमी
वेळ व पैशाची बचत
तुटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र
अशा सकारात्मक परिणामांची नोंद झाली आहे.
आगामी काळात समितीचे जिल्हानिहाय प्रक्षिक्षण, अधिक सभांचे आयोजन आणि लोकांचे मार्गदर्शन हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कौटुंबिक वाद, घरगुती तंटे असणाऱ्यांनी तंटामुक्त समितीकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
—
देणगी करमुक्त (80G)
संस्थेला दिलेली देणगी इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 सेक्शन 80G (5) अन्वये करमुक्त आहे. देणगीदारांनी आधार, पॅन व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक.
—
बँक माहिती
Akhil Lohar Gadilohar Samaj Vikas Sanstha
Bank of Baroda, Hadapsar Branch
IFSC: BARB0HADAPS
A/C No.: 24830100009194

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























