Homeताज्या बातम्याउरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज उत्खनन प्रकरण : प्रशासनाचे दुर्लक्ष, बेकायदेशीर उत्खनन सुरूच –...

उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज उत्खनन प्रकरण : प्रशासनाचे दुर्लक्ष, बेकायदेशीर उत्खनन सुरूच – पत्रकारांवर दबाव व धमकीचा गंभीर आरोप

उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज उत्खनन प्रकरण : प्रशासनाचे दुर्लक्ष, बेकायदेशीर उत्खनन सुरूच – पत्रकारांवर दबाव व धमकीचा गंभीर आरोप

पुणे | प्रतिनिधी
उरळी कांचन–शिंदवणे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप पत्रकार आमिर मोहम्मद शेख (Crime Maharashtra Live News) यांनी केला आहे.
सदर प्रकरणाबाबत दिनांक 5 व 6 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, खाण व महसूल विभाग तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलद्वारे सविस्तर तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित प्रशासनाकडे ई-मेल पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तथापि, मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश येऊनही आजपर्यंत कोणताही सविस्तर कारवाई अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रकरणातील गंभीर बाबी
उरळी कांचन–शिंदवणे परिसरात :
बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे आरोप
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याचा संशय
पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
तक्रार करणाऱ्या पत्रकारांवर दबाव, धमकी व मारहाणीचे प्रकार
संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर व दुर्लक्ष
अशी अनेक गंभीर तथ्ये समोर आली आहेत.
पत्रकारांवरील दबावाचा आरोप
तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरणात माहिती मागितली असता “तक्रार करून काहीही होणार नाही” अशा स्वरूपाची उत्तरे मिळाल्याचा आरोप पत्रकार आमिर शेख यांनी केला आहे.
यामुळे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (कलम 19) व जीवन व व्यक्तिगत सुरक्षेच्या अधिकाराचा (कलम 21) भंग होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
प्रशासनाकडे थेट मागणी
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत :
उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी
दोषी व्यक्ती व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई
उत्खनन, वाहतूक, जप्ती, दंड व FIR संदर्भातील सविस्तर लेखी कारवाई अहवाल जाहीर करणे
तक्रारदार पत्रकारांना तत्काळ संरक्षण देणे
भविष्यात अशा बेकायदेशीर उत्खननावर आळा घालण्यासाठी कडक प्रशासकीय उपाययोजना
इशारा
जर लवकरात लवकर ठोस कारवाई व पारदर्शक अहवाल समोर आला नाही, तर हा विषय
राज्य मानवाधिकार आयोग, लोकायुक्त, उच्च न्यायालय व अन्य घटनात्मक यंत्रणांकडे नेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर प्रकरणात ई-मेल संवाद, कॉल रेकॉर्डिंग, फोटो-व्हिडिओ व इतर पुरावे उपलब्ध असून आवश्यकतेनुसार ते सादर करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाडेकरूंचा तपशील लपवल्याप्रकरणी ३८ घरमालकांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : भाडेकरूंना सदनिका किंवा घरे भाड्याने देताना माहिती न दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी ३८ घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.भारतीय न्याय संहिता...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत ७० हजार मतांनी आघाडी घेत विक्रम...

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार या दोन्ही विक्रमांना आव्हान देऊ शकतात. मतमोजणीच्या आठव्या फेरीच्या शेवटी आलेल्या ताज्या अपडेटनुसार, ती 70,369 मतांनी...

77L चांदी, कृत्रिम दागिन्यांची चोरी 4 पकडले | पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने 23 एप्रिल रोजी चाकण येथील दागिन्यांच्या शोरूममधून 77.22 लाख रुपयांच्या चांदीच्या आणि इमिटेशन ज्वेलरीच्या चोरीप्रकरणी पाच संशयितांना अटक...

महाराष्ट्र जनगणना 2027: डेटा गोपनीय, घरोघरी पडताळणी अनिवार्य, अधिकारी म्हणतात. पुणे बातम्या

पुणे: 2027 च्या जनगणनेसाठी स्वयं-गणना शुक्रवारी राज्यभरात सुरू झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचूकता आणि गोपनीयतेची खात्री करून डेटा संरक्षण आणि...

ऑनलाइन फसवणूक करून महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक. पुणे बातम्या

पुणे : निगडी येथील एका महिलेला ई-कॉमर्स वेबसाइटच्या कस्टमर केअर विभागात तक्रार देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.26 एप्रिल रोजी महिलेने...

error: Content is protected !!