Homeताज्या बातम्या​कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यात नियमांना हरताळ; शेतकऱ्यांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा 'एसी'त ऐशआराम!

​कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यात नियमांना हरताळ; शेतकऱ्यांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा ‘एसी’त ऐशआराम!

​पुणे:
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील काही अधिकाऱ्यांनी शासकीय नियम आणि जीआर (शासन निर्णय) चे थेट उल्लंघन करून आपल्या दालनात अनधिकृतपणे वातानुकूलित यंत्रणा (AC) बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार एसीची सुविधा लागू नसतानाही, शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून वीजेचा अपव्यय केला जात असल्याचा गंभीर आरोप जय भीम संघटनेने केला आहे. याप्रकरणी दोषींवर तातढीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
​पंतप्रधानांच्या आवाहनाला केराची टोपली
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऊर्जा बचतीसाठी (Save Energy) सातत्याने देशातील जनतेला आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे पुण्याच्या बाजार समितीत मात्र शासकीय ऊर्जेची आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय नियमांनुसार ज्या पदांसाठी एसीची सुविधा मंजूर नाही, अशाही अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून एसी बसवून घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
​शेतकऱ्यांच्या रक्ताच्या घामावर डल्ला?
रात्रंदिवस शेतात रक्ताचे घाम गाळून शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून बाजार समितीचा महसूल जमा होतो. मात्र, याच पैशाचा वापर करून काही अधिकारी मात्र एसीच्या थंड हवेत ऐशआराम करत असल्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​जय भीम संघटनेच्या मुख्य मागण्या:
​अधिकाऱ्यांच्या दालनातील अनधिकृत एसी तात्काळ काढण्यात यावेत.
​आतापर्यंत या एसीसाठी झालेल्या वीज बिलाची आणि खरेदीची वसुली संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या खिशातून करण्यात यावी.
​शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई व्हावी.
​”शेतकऱ्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तात्काळ हे अनधिकृत एसी काढून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा जय भीम संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— जय भीम संघटना, पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बालेवाडीची हाक : वाहतुकीचे सर्वेक्षण, मग पूल खुला. पुणे बातम्या

पुणे: शहरामधील विकास आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे जात आहेत, बहुतेक वेळा त्यांच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय नुकसान होत नाही.रहिवासी वारंवार निदर्शनास आणून देत...

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरणाऱ्या सेवकाला अटक | पुणे...

इंडियन मनी वेक्टर इलस्ट्रेशन. भारतीय रुपयाची पोती, नाणी आणि नोटा. प्रत्येक वस्तू वेगळी. पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरल्याप्रकरणी...

मेंटल हॉस्पीट सिस्टम हॅक, नऊ कर्मचारी ‘टर्मिट’, पगार गमावला. पुणे बातम्या

ऑनलाइन प्रणालीतील बदल फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले आणि तीन महिन्यांनंतर ते समोर आले पुणे : विश्रांतवाडी पोलिस एका प्रकरणाचा तपास करत आहेत...

रावेत पुलाच्या मध्यभागी एसयूव्ही अचानक उलटल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पुणे बातम्या

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत येथील बोपदेव महाराज पुलावर तीन जणांचे कुटुंब, एक जोडपे आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी हे बदलापूर येथे...

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते. पुणे बातम्या

इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

error: Content is protected !!