डेक्कन कॉलेज येथे हजरत सय्यद शमशुद्दीन कादरी रह. ५२९ वा उर्स मुबारक उत्साहात संपन्न
पुणे, दि. १५ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी): येरवडा येथील डेक्कन कॉलेज परिसरात हजरत सय्यद शमशुद्दीन कादरी रह. यांच्या ५२९ व्या उर्स मुबारक निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक विधी, दुआ, फातिहा आणि कव्वालीच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून उर्स सोहळ्याचा लाभ घेतला.
उर्स निमित्ताने पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री हनिफभाई शेख यांच्या हस्ते दरगाह ख़ादिम श्री हमिद अब्बास सय्यद यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दरगाहच्या सेवाकार्यातील त्यांचे योगदान, भाविकांना दिली जाणारी मदत व व्यवस्थापनातील परिश्रम याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी दरगाह ख़ादिम श्री हमिदभाई सय्यद यांनीही संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री हनिफभाई शेख यांचा शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच मित्रबंधू श्री कमलजीतसिंग साहेब यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी उर्साच्या पवित्र परंपरेचे जतन व समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.
उर्स सोहळ्यात भंडाऱ्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. सायंकाळी आयोजित कव्वाली कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. सूफी संगीतातील सादरीकरणामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दरगाहमध्ये हजेरी लावून दुआ मागितली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दरगाह कमिटी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. पोलिस बंदोबस्त व स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे योग्य नियोजन करण्यात आले. एकूणच ५२९ वा उर्स मुबारक सोहळा उत्साहात, शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























