Homeताज्या बातम्यापोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यानाचे...

पोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यानाचे आयोजन

पोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यानाचे आयोजन

आज दिनांक ०६/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. एमआयटी विद्यापीठ, लोणी काळभोर, पुणे याठिकाणी पोलीस वर्धापन दिनानिमित्त व्यसन मुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताह या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. त्यामध्ये डॉ. राजकुमार शिंदे (IPS), पोलीस उपायुक्त, परिमंडळ-०६, पुणे शहर यांनी बोलाताना सांगितले की, स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतुक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून खरे सामर्थ्य वेगात नसुन नियंत्रणात असते. हे तरूणांनी समजून घेतले पाहिजे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे तसेच अंतर्गत सुरक्षेसाठी कम्युनिटी पोलिसिंग आवश्यक असून पोलीस वर्धापन दिन सप्ताहादरम्यान तरूणांनी पोलीसांशी संवाद साधावा. पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील कार्य पध्दती समजून घ्यावी, तसेच वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून काम करून पोलीस दलाचा प्रत्यक्ष, अनुभव घ्यावा.

तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पातळ्यांवर प्राप्त होणाऱ्या गुरूंची भूमिका अत्यंत मोलाची असते. आई-वडिल हे आद्य गुरू, तर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे दुसरे गुरू असतात. परंतु एखाद्याचे वर्तन खराब असेल आणि ते पहिल्या दोन गुरूंच्या नियंत्रणाबाहेर गेल्यास तिसरे गुरू अर्थात पोलीसांना हस्तक्षेप करावा लागतो. त्यामुळे या गुरुच्या सान्निध्यात आले की कुठलाही शिष्य नक्कीच सुधारतो, अशी कोटी डॉ. शिंदे यांनी केल्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

राजेंद्र करणकोट, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतुक विभाग यांनी वाहतुक नियमांच्या पालनावर भर दिला तसेच विद्यापीठाच्या शिस्तीचे कौतुक करताना ही शिस्त आध्यात्मिक पायावर निर्माण झाल्याने नमूद केले व वाहतूक सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी वर्धापन दिनाच्या संदर्भाने पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या माहिती देण्यात आली तसेच एनडीपीएस कायदा १९८५ मधील तरतुदींबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमांच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे परिमंडळ-६, पुणे शहर एमआयी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, हडपसर वाहतुक विभागाचे राजेंद्र करणकोट एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रा. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी हेल्मेट परिधान करून भाजपची धमकी दिली आहे. पुणे बातम्या

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

HC-नियुक्त प्रशासकाची अवहेलना करण्यावरून AITA अंतरिम पॅनेल कायदेशीर पेचात | पुणे बातम्या

पुणे : अखिल भारतीय टेनिस असोसिएशनची (एआयटीए) अंतरिम कार्यकारी समिती दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकाला सहकार्य करण्यास नकार दिल्याने कायदेशीर...

चंदननगरमध्ये मारहाण करून मोबाईल पळवणारे तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे: रस्त्यावरून गाडी नीट चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास...

पुणे पोलिसांची धडक कारवाई: इन्स्टाग्रामवरून पिस्टल विकणारा सराईत गुन्हेगार लातूरमधून अटक; ५ गावठी पिस्टल...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या खंडणी विरोधी पथक-२ ने एक मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावरून अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: येवलेवाडी परिसरात तब्बल पावणेसात लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह आरोपी जेरबंद!

पुणे: शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पुणे शहराच्या येवलेवाडी पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले...

error: Content is protected !!