Homeताज्या बातम्याबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धान्य किट वाटप; भारतीय पॅंथर संघटनेचा सामाजिक उपक्रम

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धान्य किट वाटप; भारतीय पॅंथर संघटनेचा सामाजिक उपक्रम

पुणे | प्रतिनिधी
दि. 19 एप्रिल 2026 रोजी भारतीय पॅंथर संघटना संस्थापक व अध्यक्ष माननीय गणेश भाऊ लांडगे यांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त गरजू नागरिकांसाठी धान्य किट वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सौ. अस्माताई वसीम शेख, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. राजा भाऊ कांबळे आणि महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलच्या संपादिका मा. प्रतिक्षा ताई तायडे यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते गरजू कुटुंबांना धान्य किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता, न्याय आणि बांधिलकी यांचा संदेश दिला. गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतीय पॅंथर संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय योगेश कांबळे आणि पुणे शहर उपाध्यक्ष माननीय आकाश गीते यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
याच प्रसंगी, राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या पुणे शहरात चालणाऱ्या “जिथे अन्याय तिथे न्याय” या कार्याची दखल घेत भारतीय पॅंथर संघटनेने राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे सामाजिक चळवळींना अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.
हा उपक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!