सोनई शिंगणापूर रोड लगत पिंपरी अवघड येते भीषण अपघात
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात आज दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात होऊन या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली.

राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात असलेल्या तांबे पेट्रोल पंप जवळ आज दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजे दरम्यान नाशिक येथील काही तरुण तीन चाकी रिक्षामधून शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी एक खाजगी ट्रॅव्हल बस शिंगणापूर येथून राहुरीकडे येत होती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. धडक दिल्या नंतर ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील तीनजण जागीच ठार झाल्याचे माहिती समोर येत आहे. तर रिक्षा मधील इतर तरुण व ट्रॅव्हल्स मधील काही भाविक असे अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. परिसरातील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव मदतकार्य केले. राहुरी येथील भागवत वराळे, बाळासाहेब वराळ, प्रथमेश वराळे, आकाश लहांनगे, सचिन जाधव आधी रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी हजर झाले. आणि जखमींना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना घोषित केले. तर जखमी झालेल्या अनेक जणांना इतरत्र खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























