Homeताज्या बातम्याचंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी...

चंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पुणे:
प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदुकाका सराफ, चंदननगर यांची फसवणूक करून १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीस चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी
​दिनांक ०३/०८/२०२६ ते दि. ०४/०८/२०२६ दरम्यान चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि., जुना मुंढवा रोड, द्वारकागार्डन जवळ, चंदननगर, पुणे येथे हा प्रकार घडला. आरोपी सिद्धार्थ झेंडे व एका महिलेने आपसात संगनमत करून सोने खरेदी करण्याचा बहाणा केला व फिर्यादीचा विश्वास संपादन केला. एकूण १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची ०३ सोन्याची बिस्कीटे (२५ ग्रॅम वजनाची ०२ व ५० ग्रॅम वजनाचे ०१) ते घेऊन गेले. त्यानंतर बिलापोटी एका बँकेचा अकाऊंट नंबर दिला; परंतु, सदर अकाऊंटमध्ये पैसे नाहीत हे माहीत असूनही फसवणूक करण्याच्या उद्देशाने तो नंबर देण्यात आला.
​या प्रकरणी चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजर यांनी दिनांक ०६/०८/२०२६ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३४८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१६ (२), ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​आरोपीचा शोध व कारवाई
​गुन्ह’तील आरोपी सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८ वर्षे, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) हा त्याच्या गावी नसल्याची माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने तात्काळ चंद्रपूर येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले.
​चौकशी केली असता, त्याने चंदुकाका सराफ ज्वेलर्समधून फसवणूक करून नेलेली सोन्याची बिस्किट्स इंदापूर येथील एका सोनाराला विक्री करून त्याच्याकडून रोख रक्कम घेतल्याची माहिती दिली. आरोपीजवळ सोने विक्री केलेल्या रोख रकमेपैकी ०८,५०,०००/- रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
​इतर गुन्हे आणि वाढीव तपास
​तपासामध्ये निष्पन्न झाले की, हा आरोपी प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करत असे. तसेच, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील अनेक कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमीष दाखवून त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी भिगवण पोलीस स्टेशन व विमानतळ पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे करीत आहेत.
​पोलीस अधिकारी व पथक
​सदरची यशस्वी कामगिरी खालील अधिकारी व अंमलदारांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली:
​मार्गदर्शन: अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०७, पुणे शहर) श्री. अबिनाशकुमार, सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग, पुणे शहर) श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (चंदननगर पोलीस स्टेशन) श्रीमती. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस.
​तपास पथक: सहायक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे, तसेच पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, सचिन कदम, रामदास घावटे, किरण घुटे, प्रवीण भालचीम, माऊली लहाणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहरची मोठी कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसांसह दोन सराईत आरोपी...

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर २०२६: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह दोन जणांना...

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

error: Content is protected !!