Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका, पोलीस आयुक्तांचं कडक फर्मान

पुणे पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका, पोलीस आयुक्तांचं कडक फर्मान

पुणे पोलिसांचा राजकीय पक्षांना दणका, पोलीस आयुक्तांचं कडक फर्मान

पुणे; दि.१७ (शशिकांत पाटोळे) : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये, तसेच राजकीय संघर्षातून उद्भवणारे तणाव आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांना कडक इशारा दिला आहे.

यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास किंवा आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट निर्णय पुणे पोलिस प्रशासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल घडलेल्या वादग्रस्त घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे कोणत्याही पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयासमोर मोर्चा, घोषणाबाजी किंवा आंदोलन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

*आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक*
लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सर्वांनाच आहे, मात्र तो शांततामय, कायद्याच्या चौकटीत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा न आणणाऱ्या पद्धतीने केला गेला पाहिजे. शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे यापुढे आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील, तसेच ठरावीक ठिकाणीच आंदोलन करण्यास अनुमती दिली जाईल.

*कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यास मनाई*
या निर्णयानुसार, राजकीय पक्षांनी आपले आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवरच करावेत. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आले आहे.

*कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय*
दरम्यान, या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत करताना, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तो आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काही पक्षांनी यावर नाराजी दर्शवत, लोकशाही अधिकारांवर बंधने येत असल्याची भूमिका मांडली आहे. मात्र, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!