Homeताज्या बातम्यावेळेआधीच थंडीला रामराम, उन्हाचा चटका वाढला

वेळेआधीच थंडीला रामराम, उन्हाचा चटका वाढला

पुणे; दि.१७ (शशिकांत पाटोळे) : थंडी गायब झाली आहे आणि आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या दोन आठवड्यांत महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.राज्यात जानेवारीत पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती, त्यामुळे कोरडेपणा वाढला आहे.

*कोकणात कसं राहील हवामान?*
उत्तर भारतातून येणारे थंड वारे आता थांबले असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या उबदार वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही आता ‘स्वेटर’ कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला, तरी बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*या जिल्ह्यांवर पावसाचं संकट*
दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा शिडकावा होऊ शकतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच अनेक जिल्ह्यांत तापमान ३५ ते ३७ अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता यंदा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि खान्देशात उन्हाचा तडाखा जास्त असेल.

*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी*
शेतीसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे, सध्या मान्सूनवर परिणाम करणारी एल निनो स्थिती आता कमकुवत होत आहे. मार्च-एप्रिलपर्यंत ही स्थिती संपुष्टात येऊन न्यूट्रल होईल, असा अंदाज आहे. जर मे-जूनपर्यंत ला निना स्थिती सक्रिय झाली, तर यंदाचा मान्सून समाधानकारक राहू शकतो. मात्र, यावर पुढील एक महिना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!