पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक २६ मे २०२६ रोजी रात्री ००:०१ वाजल्यापासून ते दिनांक ०८ जून २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत लागू राहतील. पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(२)(३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.
आदेश लागू करण्याचे कारण
पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषणे आयोजित केली जातात. तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया आणि आगामी बकरी ईद व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.
’या’ गोष्टींवर असेल संपूर्ण बंदी:
आदेशाच्या कालावधीत संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात खालील कृत्यांवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे:
शस्त्रे व घातक वस्तू बाळगणे: शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, दगड किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई आहे.
स्फोटक व ज्वलनशील पदार्थ: कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा ज्वलनशील द्रव्य सोबत बाळगणे.
पुतळे व प्रतिमा दहन: कोणत्याही व्यक्तीचे किंवा पुढाऱ्याचे चित्र, प्रतिमा प्रदर्शन करणे किंवा प्रतीकात्मक प्रेताचे दहन करणे.
घोषणाबाजी व गाणी: मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, आक्षेपार्ह गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे.
प्रक्षोभक भाषणे: सभ्यता, नैतिकता आणि राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे किंवा तशा जिन्नसांचा जनतेत प्रसार करणे.
आक्षेपार्ह फलक व चिन्हे: सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात आणणारे अथवा राज्य उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरू शकतील असे फलक, चित्रे किंवा चिन्हे तयार करणे व त्यांचे प्रदर्शन करणे.
जमावबंदी: पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
आदेशातून कोणाला सवलत?
हा प्रतिबंधात्मक आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना तसेच ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाही. याशिवाय, खाजगी सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड), गुरखा किंवा चौकीदार जे ३.५ फुटांपर्यंतच्या लाठ्या बाळगतात, त्यांनाही यातून सूट देण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
आदेशाची मुदत संपल्यानंतरही, या कालावधीत झालेल्या कोणत्याही उल्लंघनासंदर्भात कायदेशीर तपास, दंड, जप्ती किंवा शिक्षेची कारवाई सुरू ठेवली जाईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच गुन्हेगारांची रील (Reel) बनवून सोशल मीडियावर दहशत पसरवणे किंवा धमकी देणाऱ्यांवरही कडक लक्ष ठेवले जाईल.
आदेशाची माहिती व अंमलबजावणी:
हा आदेश मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हा आदेश महत्त्वाच्या व सार्वजनिक ठिकाणी चिकटवून, ध्वनीक्षेपकाद्वारे (लाऊडस्पीकर) नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यांना प्रती सादर व अग्रेषित:
सविनय सादरीकरण: मा. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह-विशेष मंत्रालय, मुंबई), मा. पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. पोलीस आयुक्त व अपर पोलीस महासंचालक (पुणे शहर), आणि मा. आयुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई).
प्रशासकीय माहिती व कार्यवाही: अपर पोलीस आयुक्त (गुन्हे, प्रशासन, पश्चिम व पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर), सर्व पोलीस उप-आयुक्त / सहाय्यक पोलीस आयुक्त / वरिष्ठ पोलीस अभियोक्ता (पुणे शहर), सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन/शाखा, पुणे शहर).
प्रसिद्धी व इतर: जिल्हा प्रसिद्धी अधिकारी (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे), व्यवस्थापक (येरवडा मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, पुणे – राजपत्रात प्रसिद्धीसाठी), आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन – पोलीस नोटीस प्रसिद्धीसाठी).
सस्नेह अग्रेषित: मा. विभागीय आयुक्त (पुणे विभाग), मा. आयुक्त (म.न.पा., पुणे), मा. जिल्हा सत्र न्यायाधीश (पुणे), आणि मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी (पुणे).

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,



















