Homeताज्या बातम्याखराडीतील गार्डन व ऍमेनिटीज रिझर्व्ह जागेवर झाडांची कत्तल; ५ दिवसांपासून कचऱ्याला आग...

खराडीतील गार्डन व ऍमेनिटीज रिझर्व्ह जागेवर झाडांची कत्तल; ५ दिवसांपासून कचऱ्याला आग – प्रशासन मौन?

खराडीतील गार्डन व ऍमेनिटीज रिझर्व्ह जागेवर झाडांची कत्तल; ५ दिवसांपासून कचऱ्याला आग – प्रशासन मौन?

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2026 (Crime Maharashtra Live News)
पुणे शहरातील खराडी परिसरात सर्वे नं. 3/6 येथील सुमारे दीड एकर गार्डन रिझर्वेशन जमिनीवर शेकडो प्राणवायू देणाऱ्या झाडांची कथितपणे कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या जागेवर व्यावसायिक इमारतींचा राडारोडा व कचरा टाकण्यात येत असून, मागील पाच दिवसांपासून या कचऱ्याला सतत आग लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अजीम शेख यांनी दिनांक 11/02/2026 रोजी रात्री 10:13 ते पहाटे 2:30 या कालावधीत संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार संपर्क साधून झाडांची कत्तल व आगप्रकरणी कारवाईची मागणी केली. मात्र, अद्याप झाडांची कत्तल करणारे व कचरा टाकून आग लागण्यास जबाबदार असणाऱ्या अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप आहे.
🌳 ऍमेनिटीज स्पेसवरही घाला
याच परिसरातील सर्वे नं. 16/4ब येथील ऍमेनिटीज स्पेस रिझर्व्ह (आरक्षित) जमिनीतही शेकडो झाडांची सर्रास कत्तल सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी राखीव असलेल्या जागांवर अशा प्रकारे झाडांची तोड होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
🔥 पाच दिवसांपासून धूर; आरोग्य धोक्यात
कचऱ्याला वारंवार आग लागल्याने परिसरात धुराचे ढग पसरत आहेत. रहिवाशांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
❓ प्रशासनाचे मौन का?
गार्डन रिझर्वेशन व ऍमेनिटीज स्पेस ही सार्वजनिक व पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जमीन.
झाडतोडीसाठी आवश्यक परवानगी घेतली होती का?
कचरा टाकण्यास कोण जबाबदार?
वारंवार आग लागत असताना अग्निशमन विभागाची नोंद आहे का?
स्थानिक नागरिकांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण अधिनियमानुसार दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मा.राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा बैठक संपन्न.

पुणे..महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २७.०४.२०२६ रोजी...

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात. पुणे बातम्या

पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले | पुणे बातम्या

पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

पुण्यात ‘वृक्षाथॉन’ हाफ मॅरेथॉनचे आयोजन; पर्यावरण संरक्षण व फिटनेसचा संदेश देणारा अनोखा उपक्रम

पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ – शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी कार्यरत असलेल्या वृक्षाथॉन फाऊंडेशन तर्फे VHM Edition 5.0 या उपक्रमाच्या प्रमोशनसाठी...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. पुणे बातम्या

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

error: Content is protected !!