पांचगणी ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे भव्य उद्घाटन..
पुणे; दि.१५ (शशिकांत पाटोळे) :
वाई, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी येथे ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. युरोपीय देशांमध्ये प्रामुख्याने आयोजित होणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच भारतातील पांचगणीला मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून स्पर्धेच्या परीक्षणासाठी Paragliding World Cup Association चे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ञ पंच उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पांचगणीची ओळख केवळ पर्यटन स्थळापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निर्माण होईल. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा,
असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आनंद चिरंगुटे, पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच स्पर्धेच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून पांचगणीकरांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन हाय फ्लाय पॅराग्लायडिंगचे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी केले.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























