Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मनमानी वर्तनाविरोधात मुख्य सचिव, DOPT व UPSC अध्यक्षांकडे...

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मनमानी वर्तनाविरोधात मुख्य सचिव, DOPT व UPSC अध्यक्षांकडे तक्रार

पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (Estates) पृथ्वीराज बी. पी. यांच्या कथित मनमानी व अयोग्य वर्तनाचा प्रकार प्रसारमाध्यमांत झळकल्यानंतर संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव, भारत सरकारचे कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DOPT) तसेच संघ लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष यांच्याकडे अधिकृत तक्रार सादर करण्यात आली आहे.
तक्रारदार पत्रकार श्री. उमेर मैनुद्दीन शेख (वरिष्ठ पत्रकार, इंडियन टाइम्स रिव्ह्यू) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकृत कामानिमित्त भेट दिली असता, अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले व कार्यालयाबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे पत्रकारितेच्या कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी 06 जानेवारी 2026 रोजी शपथपत्राद्वारे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात कर्तव्यच्युती, सत्तेचा गैरवापर व गैरवर्तन यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई व फौजदारी कारवाईसाठी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
तक्रार प्रत खालील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे –
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
विभागीय आयुक्त, पुणे विभाग
महापालिका आयुक्त व प्रशासक, पुणे महानगरपालिका
सचिव, कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DOPT), भारत सरकार
अध्यक्ष, UPSC, नवी दिल्ली
पत्रकार संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. सार्वजनिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी कायदेशीर व सन्मानपूर्वक वर्तन करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी सांगितले की, “सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर माहिती घेण्यासाठी भेट दिली असता अशा प्रकारे अडथळा निर्माण होणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी.”
या प्रकरणाकडे राज्य व केंद्र शासन स्तरावरून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!