Homeआरोग्यवांबोरी येथे सुमारे दीड लाखाचा मावा व मुद्देमाल जप्त

वांबोरी येथे सुमारे दीड लाखाचा मावा व मुद्देमाल जप्त

वांबोरी येथे सुमारे दीड लाखाचा मावा व मुद्देमाल जप्त
संपादकीय शिवाजी दवणे 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घराच्या खोलीमध्ये मशीनने सुगंधी तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून १ लाख ४६ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांच्या विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देऊन पथक रवाना केले. शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पप्पु जाधव हा वांबोरी ते देहरे जाणारे रस्त्यालगत, मोरे वस्ती, वांबोरी येथे एका घराच्या खोलीमध्ये मशीनने सुगंधी तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत आहे. पथकाने पंचासमक्ष या ठिकाणी छापा टाकला असता राहुल उर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव, वय ३०, रा. वांबोरी, ता. राहुरी, हा इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे मुद्देमाला बाबत विचारपूस केली असता तो व त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पु गोरक्षनाथ जाधव, रा. वांबोरी, ता. राहुरी, (फरार) हे सुगंधित मावा तयार करत असल्याचे सांगीतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणावरून १ लाख ४६ हजार ५४० रुपये किंमतीचा १५ किलो सुगंधीत मावा, १० किलो सुपारी, १ इलेक्ट्रीक मोटार व मशीन, एक वजन काटा, २ किलो चुना, सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करून आरोपी विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक, सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वायू आणि जलप्रदूषणप्रकरणी एमपीसीबीने बारामती ॲग्रोला नोटीस पाठवली आहे. पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक. पुणे...

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे | शांतीनगर, येरवडा शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त भागात दरवर्षी...

Edu विभाग शाळांना मतदार यादी पुनरिक्षण कर्तव्यावरील शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यास सांगतो. पुणे...

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात. पुणे : राज्य सरकारने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...

केतन अग्रवाल मर्डर केस: चेतनसोबत सिया गोयलचे ‘गुप्त लग्न’, स्नॅपचॅट संदेश आणि बरेच काही:...

पुण्यातील रियाल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास करत असलेले पोलीस त्याची मंगेतर सिया गोयल हिने तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीशी गुपचूप लग्न केले होते...

error: Content is protected !!