Homeक्राईमहडपसर येथे वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसर येथे वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे– हडपसर पदपथावर लापलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. ही घटना हडपसर भागात घडली असून वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार आघाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पदपथावर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोईंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत असताना आरोपींनी कारवाईस विरोध करुन हवालदार आघाव यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.आरोपींकडून हवालदार आघाव यांना चप्पलेने मारहाण करुन धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. त्यांनी आघाव यांना धमकी सुद्धा दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरी चोरी करून पसार आरोपीला अटक; येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे, दि. २० नोव्हेंबर २०२६: येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ व मारहाण करत जबरी चोरी करून पसार झालेल्या आरोपीला येरवडा...

error: Content is protected !!