Homeक्राईमहडपसर येथे वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसर येथे वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे– हडपसर पदपथावर लापलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. ही घटना हडपसर भागात घडली असून वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार आघाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पदपथावर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोईंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत असताना आरोपींनी कारवाईस विरोध करुन हवालदार आघाव यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.आरोपींकडून हवालदार आघाव यांना चप्पलेने मारहाण करुन धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. त्यांनी आघाव यांना धमकी सुद्धा दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!