Homeताज्या बातम्याडॉक्टरांकडे खंडणी मागणाऱ्या ५८ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

डॉक्टरांकडे खंडणी मागणाऱ्या ५८ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे:
येरवडा परिसरातील एका डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात लक्ष्मीनगर पोलिसांना यश आले आहे. अमोल जिवराज पिल्ले (वय ४६ वर्षे, रा. जयजवान नगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
​नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल पिल्ले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन, यादगीर आणि राज्य कर्नाटक पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि हत्यार बाळगणे असे एकूण ५८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती.
​दि. ८ जुलै २०२६ रोजी, आरोपी अमोल पिल्ले याने जयजवान नगर येथील एका हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्टर यांना धमकावले. तसेच, ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून, पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी ९ जुलै २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०८(४), ३५१(३), ३५२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ आणि क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला (गु.र.क्र.१०३/२०२६).
​पोलिसांची कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी तपास पथकाला आरोपीला तात्काळ शोधून अटक करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पोलीस अंमलदार राहुल परदेशी आणि अक्षय शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी अमोल पिल्ले याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपली ओळख पटवली असून, त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेला लोखंडी कोयताही पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. सुरवसे करत आहेत.
​यशस्वी कामगिरी
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (परि. ४) चिलुमुला रजनिकांत आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, तपास पथकाचे अधिकारी सपोनि निखिल पवार, सपोनि दत्तात्रय लिगाडे आणि पोलीस अंमलदार यशवंत खंदारे, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, भिमराव कांबळे, सुरज ओंबासे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, किरण भागीत, अमोल वायाळ व सचिन कुचेकर यांनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक...

पुणे शहर आयुक्तालयात विनापरवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!